2

Published 10 months ago महत्त्व : मेथीची पाने व बिया आरोग्यास हितावह असतात. स्त्रिला प्रसुतीनंतर जास्त दूध येण्यासाठी मेथ्याचे लाडू खावयास देतात. उन्हाळ्याची झळ लागल्यास सुकलेली मेथी थंड पाण्यात भिजत घालून ते पाणी वस्त्रगाल करून त्यात मध एकत्र करोन घ्यावे. मेथीचा वापर प्रामुख्याने केसांसाठी व सौंदर्य प्रसाधनांसाठी होतो. दुभत्या जनावरांना खुराकातून मेथी बी देतात. मेठीमाध्ये पाणी, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, तंतू कर्बोदके, लोह, स्फुरद, सोडियम यासारखे शरीरास आवश्यक असणारे घटक उपलब्ध आहेत. तसेच अ, ब, क, ड जीवनसत्त्वे आणि अॅस्कार बिक आम्लाचे प्रमाण जास्त आढळते. मेथीची लागवड जम्मू काश्मिर, उत्तरप्रदेश , मध्येप्रदेश, तमिळनाडू, पंजाब, महाराष्ट्र अशा विविध राज्यातून केली जाते. मेथीची लागवड खरीप व रब्बी हंगामात करता येते. त्यामुळे मेथीचे लागवडीचे तंत्र सहज सोपे आहे.

Agribusiness
Nandkishor Dhekane Pune, Maharashtra, India
10 months ago
https://agfuse.com/article/2

Categories: Agribusiness

Nandkishor Dhekane
Nandkishor Dhekane

Advertisement